29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत

पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत

0
35

मुंबई,दि.11 : पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याची वेळ सरकारवर आली. त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. १७ जूनपासून अधिवेशन सुरू होणार असून, राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे तर, परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. जे नवीन सरकार आल्यानंतरचे असेल.