साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आजपासून शुभारंभ

0
14

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार टपाल तिकीटाचे प्रकाशन

 मुंबई, दि.1 ऑगस्ट :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष 1 ऑगस्ट 2019 रोजी सुरु होणार आहे. या निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या टपाल तिकीटाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्या दि. 1ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. रंगशारदा सभागृह, के.सी. मार्ग, लिलावती रुग्णालयाजवळ, बांद्रा (प.), मुंबई-400050 येथे होणार आहे.

            तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी अंतर्गत असलेल्या शाहीर अमर शेख अध्यासनामार्फत सकाळी 10.30 वा. एक दिवसीय चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचे उद्‌घाटन उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर करणार आहेत.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव हायस्कूल, वाटेगाव जि.सांगली येथे सकाळी 9.00 वा. अभिवादन कार्यक्रम व राज्यस्तरीय शाहिरी स्पर्धा होणार आहे. दुपारी 3.00 वा. बालगंधर्व नाट्यगृह, मिरज, जि.सांगली येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.