30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home महाराष्ट्र दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

0
42

मुंबईदि. 19 : निवडणूकविषयक कायदेआचारसंहितानिवडणूकविषयक गुन्हेईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया‘ या पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे (भा.प्र.से.) हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासासुशील चंद्रावरीष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेनाउमेश सिन्हाउप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमारसुदीप जैनराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मुंबईत राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला श्री. अरोरा यांची प्रस्तावना असून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतामुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे पुस्तक ग्रंथाली‘ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच राजकीय कार्यकर्ते ते सर्वसामान्य मतदार अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात निवडणूक आयोगाची माहितीमतदार नोंदणी प्रक्रिया आणि ओळखपत्रेउमेदवारांची पात्रताशासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरणास बंदीआचारसंहितानिवडणूक विषय गुन्हेराजकारणातील गुन्हेगारीस प्रतिबंधप्रशासकीय यंत्रणाइलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम)टपाली मतदानकायद्यातील नव्या सुधारणापेड न्युजउमेदवारांसाठी एक खिडकी योजना आणि मतदान जागृती कार्यक्रम याबाबत सविस्तर आणि सचित्र माहिती समाविष्ट आहे.