30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home महाराष्ट्र सांगली जिल्हा विकास प्राथ .शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी अनिल पाटील

सांगली जिल्हा विकास प्राथ .शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी अनिल पाटील

0
43

सावळज -दि.१४- महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा सांगली पुरस्कृत सांगली जिल्हा विकास प्राथ . शिक्षक सह.पतसंस्था मर्यादीत सांगलीच्या संचालकपदी पदवीधर शिक्षक संघटनेचे तासगाव तालुकाध्यक्ष अनिल शामराव पाटील यांची निवड करण्यात आली.  ही निवड गेल्या रविवारी ( दि.१३) झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली.

यावेळी संघटनेचे राज्यनेते गजानन पाटील,माजी चेअरमन दशरथ माळी,जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव वाघ यांनी शाळेत जाऊन त्यांचा फेटा,शाल श्रीफळ देवुन सत्कार केला. संघटनेचे उत्कृष्ट काम,सचोटी.निस्पृहवृत्ती,प्रामाणिकपणा व निष्ठा इत्यादी निकषावर त्यांची झालेली निवड आपल्या सातत्यपूर्ण कामातून सार्थ करावी .संघटना व संस्था वृध्दीसाठी स्वताःला झोकून द्यावे.स्वकार्यातून संस्था व संघटनेत आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी अपेक्षा गजानन पाटील यांनी व्यक्त केली.
सत्कारास उत्तर देताना अनिल पाटील म्हणाले संघटना आणि संस्थेने माझेवर टाकलेली ही जबाबदारी पेलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.कोणाच्याही विश्वासास तडा जावू देणार नाही.मुख्याध्यापक दगडू जाधव यांनी नियोजन केले.सूत्रसंचालन खंडागळेसर यांनी केले.सोबत दगडेसर,भगत व गायकवाड मॅडम उपस्थित होत्या.