मुंबई, दि. 6 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन येथील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ.निलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य मंगल प्रभात लोढा, राहूल नार्वेकर, माजी सदस्य तुकाराम बिडकर, राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भगत, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव सायली कांबळी आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.




