30.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्यपत्रिका तात्काळ काढावी-  विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले

शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्यपत्रिका तात्काळ काढावी-  विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले

0
36

Ø  यांत्रिकीकरण योजनेतून 2 ट्रक्टरचे वाटप

Ø  376 जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप

भंडारा  दि. 6 :-  सर्वात मोठा रोजगार शेतीमधून उभा होऊ शकतो. याकरीता सिंचन व जमिनीची आरोग्य पत्रिका काढून घेणे गरजेचे असल्याचे मत  विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी लाखनी येथे आयोजित जागतिक मृदा दिनानिमित्त रब्बी शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनी कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, पंचायत समितीचे सभापती खुशाल गिदमारे, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उमेदचे राजेंद्र इंगळे, कृषीभूषण शेतकरी रामचंद्र कापगते, शेषराव निखाडे, यादोराव मेश्राम, डॉ. जी.आर. शामकुवर, भूपेंद्रपाल सिंग, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले, तहसिलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी धीरज पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी रोहिणी डोंगरे, वंदना शिंदे, तालुका कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एन.एस. वझिरे, सविता तिडके प्रामुख्याने उपस्थित होते.

आधूनिक काळात जमिनीमध्ये रासायनिक खतांचा मोठया प्रमाणात उपयोग केल्या जात असल्याने खताची सवय होऊन पिकांसाठी जमिन मृत झाल्यासारखी झाली आहे. त्या करीता उपजाऊ जमिन राहण्याकरीता जमिनीची आरोग्य पत्रिका पाहून खतांचा वापर करावा. आजच्या युगात महिला शेतकऱ्यांचा सहभाग मोठया प्रमाणात होत असून सर्वात रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो. याकरीता कृषी शास्त्रज्ञांनी मोलाचे प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधन केंद्र पांढरे हत्ती ठरु नयेत याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

या प्रसंगी कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून ग्राम सावरी येथील ललिता फूलेकर, पोहरा येथील विष्णे गिऱ्हेपुंजे या लाभार्थ्यांना ट्रक्टर वाटप करण्यात आले. तसेच 376 शेतकऱ्यांना कृषी जमिन आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचलन पदमाकर गिदमारे यांनी केले तर आभार सुचित लकडे यांनी मानले. या कार्यक्रमास पुरुष व महिला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

blank