25.6 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पवारांना देवगिरी,अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी तर अशोक चव्हाणांना मेघदूत

उपमुख्यमंत्री पवारांना देवगिरी,अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी तर अशोक चव्हाणांना मेघदूत

0
41

मुंबई,दि.02- महाविकास आघाडी सरकारचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार नुकतंच पार पडला. त्यानंतर अद्याप खातेवाटप झालेले नाही. खातेवाटप आज होईल असे सांगण्यात येत आहे. तरीदेखील सर्व नवनिर्वाचीत मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. सरकारी बंगले वाटपानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत हे बंगले मिळाले आहेत. राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या ‘मातोश्री’वर राहणारे आदित्य ठाकरे यांना अ-6 निवासस्थान मिळाले आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी 302, सतेज पाटील यांना सुरुची-3 हे निवासस्थान मिळाले आहे.

मंत्री आणि त्यांचे बंगले

  • उपमुख्यमंत्रि अजित अनंतराव पवार- देवगिरी
  • अशोक शंकरराव चव्हाण- मेघदूत
  • दिलीप दत्तात्रय वळसे पाटील- शिवगीरी
  • अनिल वंसतराव देशमुख- ज्ञानेश्वरी
  • राजेंद्र भास्करराव शिंगणे- सातपुडा
  • राजेश अंकुशराव टोपे- जेतवन
  • नवाब मोहम्मद इस्माल मलिक- अ 5
  • दहस मियालाल मुश्रीफ- ब 5
  • वर्षा एकनाथ गायकवाड- ब 4
  • जितेंद्र सतिश आव्हाड- ब 1
  • सुनिल छत्रपाल केदार- ब 7
  • विजय वटेट्टीवार- अ 3
  • अमित विलासराव देशमुख- अ 4
  • उदय रिवंद्र सामंत- ब 2
  • दादाजी दगडू भुसे- ब 3
  • संजय दुलिचंद राठोड- क 1
  • गुलाबराव रधुनाथ पाटील- क 7
  • के. सी. पाडवी- क 3
  • संदिपान आसाराम भुमरे- क4
  • श्यामलाल उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील- क 6
  • अनिल दत्तात्रय परब- क 5
  • अस्लम रमजान अली शेख- क 2
  • यशोमती ठाकरू- ब 6
  • शंकरराव यशवंतराव गडाख- सुरुची 16
  • धनंजय पंडीतराव मुंडे- अ 9
  • अदित्य उद्धव ठाकरे- अ 6
  • अब्दुल नवी सत्तार- सुरुची 15
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील- सुरुची 3
  • शंबुराज शिवाजीराव देसाई- यशोधन 12
  • ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू- रॉकीहिल टॉपर 1202
  • दत्तात्रय विठोबा भरणे- अवंती 1
  • विश्वजीत पतंगराव कदम – निलांबरी 302
  • राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर- सुरुची 2
  • संजय बाबुराव बनसोडे- रॉकीहिल टॉवर 1203
  • प्राजक्त प्रसादराव तनपुरे- निलांबरी 402
  • अदिती सुनिल तटकरे सुनिती 10