देवरी,दि.02 : तालुक्यातील डोंगरगाव /सावली येथील रहिवासी यादवराव शिवनकर (39) या शेतकऱ्याने ओला दुष्काळ आणि सततच्या अवकाळी पावसामुळे होत असलेले पिकांचे नुकसान याला कंटाळून शेतालगतच्या मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अस्मानीसुलतानी संकट, कर्ज या विवंचनेतुन यादवराव शिवनकर यांनी आत्महत्या केली. यादवराव शिवनकर यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.




