28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home महाराष्ट्र दोन दिवसांत वाढले 1018 रुग्ण, एकूण 4, 666

दोन दिवसांत वाढले 1018 रुग्ण, एकूण 4, 666

0
455

विशेष प्रतिनिधी/मुंबई. राज्यात गेल्या दोन दिवसांत १०१८ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने सरकारची चिंता वाढली आहे. सोमवारी ४६६ नवे रुग्ण, तर ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी ७ मृत्यू मुंबईतील असून २ मृत्यू मालेगावचे आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या ४,६६६, तर मृतांचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. दुसरीकडे, दिलासादायक बातमी म्हणजे बरे होऊन घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. सोमवारी ६५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ५७२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

…तर बंधने पुन्हा टाकावी लागतील : मुख्यमंत्री

मुंबईत सोमवारी पुन्हा गर्दी दिसली. लॉकडाऊनचे नियम शिथिल केले म्हणजे ते संपले असे नाही. रुतलेले अर्थचक्र हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु लॉकडाऊन संपला असे समजून गर्दी वाढली आहे. नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले गेले नाही तर पुन्हा बंधने टाकावी लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.

रुग्णांचा तपशील

मुंबई मनपा ३०३२, ठाणे २०, ठाणे मनपा १३४, नवी मुंबई ८३, कल्याण-डोंबिवली ८४, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर ३, मीरा-भाईंदर ७८, पालघर १७, वसई-विरार १०७, रायगड १५, पनवेल ३३, नाशिक मंडळ १२९, पुणे मंडळ ६९७, कोल्हापूर मंडळ ४३, औरंगाबाद मंडळ ३३, लातूर मंडळ १२, अकोला मंडळ ५९, नागपूर ७३, इतर राज्ये- १३.

७१,६११ जण निगेटिव्ह : राज्यात ७६,०९२ चाचण्यांपैकी ७१,६११ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. सध्या राज्यात ९३,६५५ जण होम, तर ६,८७९ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेअंतर्गत २१.८५ लाख लोकांचे सर्वेक्षण झाले आहे.