26 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home महाराष्ट्र रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्रे वाटप

रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्रे वाटप

0
130

रायगड दि. 18 :  जिल्ह्यातील ३ जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.रोहा व कर्वे सामाजिक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील बारसोली आदिवासी वाडीतील लाभार्थ्यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्र्याचे वाटप करण्यात आले.यावेळी गाव कमिटी अध्यक्ष नामदेव म्हसकर, सरपंच सचिन रटाटे, यशवंत रटाटे, उपसरपंच, रोहिदास पाशीलकर, उत्तम म्हसकर,  बी.एन. कदम, सी.बी.जोशी, दीपक चिपळूणकर आदी उपस्थित होते.