कर्जमाफीवरून परिषदेत हंगामा

0
16

मुंबई दि.१४- दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या राज्यातील बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी िवरोधी पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी विधान परिषदेत जोरदार लावून धरली. त्यांच्या घोषणा आणि गोंधळ यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा बंद पाडण्यात आले. राज्य िवधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शेतकरी प्रश्नावरून गाजणार, असे यानिमित्ताने पहिल्याच िदवशी स्पष्ट झाले.

दुपारी एक वाजता परिषदेचे कामकाज सुरू झाले. कामकाज िवषयपत्रिकेमध्ये अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे, पुरवणी मागण्या सादर करणे, पुनर्स्थापनार्थ शासकीय विधेयके, सभापती-तालिका नामनिर्देशन आणि शोकप्रस्ताव असे कामकाज दाखवण्यात आले होते. परंतु िवरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यात २२ दिवसांपासून पाऊस नसल्याचे सांगत शेतकरी प्रश्नांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यास िवरोध केला. काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबतच्या २८९ च्या प्रस्तावावर चर्चेची मागणी केली.

सभापती रामराजे नाईक नंबाळकर यांनी आपण २८९ चा प्रस्ताव मान्य केला नसल्याचे सांगत कामकाज सुरू केले. त्याला िवरोध करत िवरोधी बाकांवरील सदस्य सभापतींच्या आसनासमोर येऊन जोरजोरात घोषणा देऊ लागले.

या गोंधळात सभागृह दहा िमनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा सभागृह भरताच तीच मागणी िवरोधी सदस्य करू लागले. शेवटी खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगत िवरोधी पक्षाच्या सदस्यांना शोकप्रस्तावाचे गांभीर्य नसल्याचा आरोप केला. तरीही िवरोधी सदस्यांची घोषणाबाजी चालूच होती. त्यामुळे पुन्हा दोन वेळा सभागृह तहकूब करण्यात आले. शेवटी सभापतींनी िवषयपत्रिकेत दाखवलेले सर्व कामकाज बाजूला ठेवून शोकप्रस्ताव पुकारला आणि सभागृहातील गोंधळ संपला.