*छत्रपती संभाजी नगरच्या प्रणव कोरडीची मेन्स वन लाख टेनिस टूर्नामेंट च्या मुख्य टूर्नामेंटच्या ड्रॉमध्ये प्रवेश करून व रँकिंग प्राप्त केली आहे* ऑल इंडिया टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित मेन्स वन लाख टेनिस टूर्नामेंट मध्ये क्वालिफाय राऊंडच्या चार मॅचेस जिंकून प्रणव कोरडे या छत्रपती संभाजी नगरचा खेळाडूने टूर्नामेंटच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणा टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित वन लॅक टूर्नामेंट मेंनस तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे टेनिसची मेन्सची टूर्नामेंट आयोजित केली गेली आहे.सदर टूर्नामेंट मध्ये इंदुरान्स मराठवाडा टेनिस सेंटरचा खेळाडू प्रणव कोरडे महाराष्ट्राचा खेळाडू यांनी टेनिस सिंगलच्या मॅचेस मध्ये सिद्धेश ( तामिळनाडूचा)यांच्यावर 9-6 साई शामूल(कर्नाटका) यांच्यावर 9-8 (7-4) अंतिम क्वालिफाय सामन्यात यशवंत गुन्हापल्ली तेलंगणाचा खेळाडू यांच्यावर ६-४,४-६,६-१ असा विजय संपादन करून टेनिस टूर्नामेंटच्या मुख्य ड्रॉमध्ये मध्ये प्रवेश केला आहे .आणि प्रणवणे प्रथमच अशा मोठ्या मेन्सच्या टूर्नामेंट मध्ये सहभागी होऊन क्वालिफाय राऊंड खेळून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करून सणसणाटी निर्माण केली आहे. आणि आपला ठसा मेन्सच्या स्पर्धेमध्ये सुद्धा दाखवला आहे. त्याद्वारे त्याला आता मेन्स रँकिंग सुद्धा सुरू झाली आहे.विजयाची घोडदौड चालू केली आहे. प्रणव कोरडे यास इंडोरन्स मराठवाडा एम एस एल टी ए सेंटरने स्वागत केले असून हा त्या सेंटर चा खेळाडू असून हा छत्रपती संभाजी नगरचा जूनियर गटामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. आणि प्रणव कोरडे यास श्री गजेंद्र भोसले यांनी प्रशिक्षण दिलेले आहे व देत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणवची घोडदौड चालू आहे. तसेच हा अतिशय मेहनती आणि कष्टाळू खेळाडू आहे त्याने आपला ठसा अनेक स्पर्धांमधून दाखवला आहे. इंदुरान्स कंपनीने तसेच पुढील मॅचेस साठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहे.