अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ जखमी

0
3

गोंदिया : गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्यमहामार्गावर मुरदोली जंगल परिसरातील वाघदेव देवस्थानाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक चितळ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास घडली.यावेळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाटसरून जखमी चितळ विव्हळत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली.

दरम्यान, गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने घटनास्थळ गाठून जखमी चितळाला गोरेगाव येथील वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. मागील महिन्यात ११ ऑगस्ट रोजी याच परिसरात एका कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना याच परिसरात घडली होती. तर एका महिन्यातच ही दुसरी घटना घडली असून या परिसरात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर राहत असताना या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यप्राणी सुरक्षित नसल्याची भावना वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.