धाराशिव-प्रमाणे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, मुनी सांगण्याप्रमाणे वाट मारी करण्याचे काम सोडून दिले, राम नामाचा जप करून रामायण लिहिले. वाईट काम सोडून चांगल्या कामात सुरुवात केली. त्या त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा आई-वडिलांचे, गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊन बलशाली भारत देश बनवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष शानिमे कैलास विजयकुमार यांनी मांडले.
प्रारंभी शिंगोली आश्रम शाळेत वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यवेळी पर्यवेक्षक शेख अब्बास अली, मुख्याध्यापक कुमंत शिंदे यांनी प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील रत्नाकर यांनी केल. कार्यक्रमासाठी श्री बडदापुरे सूर्यकांत, जाधव चंद्रकांत, मल्लिनाथ कोणदे, संतोष पालमपल्ले, प्रशांत राठोड इत्यादी शिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, सचिन माळी, वसंत भिसे, रेवा चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार दीपक खबोले यांनी मानले.