फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

0
4

धुळे –शहरातील ८० फुटी रोड परिसरातील लाकडाची वखार व जुन्या फर्निचरच्या (Dhule) गोडाऊनला अचानक आग लागली आहे. या (Fire) आगीत वखारील संपूर्ण लाकूड जळून राख झाली आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या ८० फूट रोड परिसरात असलेल्या लाकडाच्या वखारीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने लागलीच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धावपळ सुरु झाली होती. वखारीतून धूर निघत असल्याचे दिसताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण लाकूड असल्याने आग विझली नाही. यानंतर अग्निशमन विभागाला (Fire Brigade) आगीची माहिती देण्यात आली. जवळपास पाच ते सहा अग्निशमन बाबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अद्याप बहुतांश प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले असून अद्यापही आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
वखारीला आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या आगीत वखारीत असलेले लाकूड जळून गेले आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.