मधमाश्यांच्या हल्यात पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

0
17

गोंदिया : जिल्ह्यातील नवेगावधांब पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या धाबेपवनी AOP ला कार्यरत पोलीस कर्मचारी आनंदराव मेश्राम (वय 57)यांच्यावर मधमाश्यानीं केलेल्या महल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना 1 मे रोजी घडली.
सविस्तर असे की,पोलिस अधिक्षक कार्यालयात 1 मे दिनानिमीत्त आयोजित परेड करुन धाबेपवनीला परत येत असतांना पोलीस कर्मचारी मेश्राम यांच्यावर मधमाश्यानी हल्ला केला.यात ते गंभीर जखमी झाल्याने प्राथमीक उपचारानंतर देवरी येथील ग्रामीण रुग्नालयात उपचाराकरीता भरती करन्यात आले.परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. .