जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित रॅलीस जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी

0
22
परभणी, दि. 03 : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित रॅलीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखविण्यात आली. परभणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या शाळा, शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांची प्रभातफेरी आज काढण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस.के.भोजने यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, नारायण चाळ कॉर्नर, जिल्हा परिषद नवीन इमारत, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप झाला. जिल्ह्यातील दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी (सर्व) हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे विद्यार्थी-कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.