धाराशिव,दि.१४ -रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उपक्रमातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांनी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
चोराखळी साखर कारखाना येथे ट्रॅक्टर ट्रेलर व बैलगाडीला रेफलेक्टर लावण्यात आले.यावेळी मोटर वाहन निरीक्षक मारूती चौगले यांनी रिफ्लेक्टरचे फायदे याबाबत उपस्थित वाहन चालकांना मार्गदर्शन केले. येडशी टोलनोका या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक मारूती चौगले यांनी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन केले.तसेच तेथे बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रके वितरीत करण्यात आली.
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना ब्रेक टेस्ट ट्रॅकवर मोटार वाहन निरीक्षक श्री एस एस बंग यांनी वाहन चालकांना वाहतूक चिन्हाबाबत ओळख करून देण्यात आली व वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी समजावून त्यांना शपथ देण्यात आली.तसेच दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे, सीट बेल्ट लावणे,मद्यपान करून वाहन चालवू नये,तसेच रस्त्यावर अपघात कसे कमी होतील याबाबत मार्गदर्शन वाहन चालकांना करण्यात आले व माहिती पत्रके वाटप करण्यात आली.रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” अंतर्गत ११ जानेवारी रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव आगारात येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे यांनी उपस्थित असलेले वाहन चालक, वाहक व कर्मशाळा मॅकेनिक यांना वेगावर नियंत्रण ठेवावे, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी समजावून अपघात कसे कमी करता येतील त्याबाबत चालकांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले.माहिती पत्रके वाटप करण्यात आली.यावेळी बोधले,वाहन चालक खराडे उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” अंतर्गत ११ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ वर असुरक्षित (Vulnerable spots) ठिकाणाची पाहणी मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान यांनी करून परिसरातील नागरिकांना असुरक्षित ठिकाणी वाहने चालवीत असताना सुरक्षिततेच्या उपायांचा अवलंब करणेबाबत मार्गदर्शन केले.तसेच हेल्मेट वापरणेचे व सीट बेल्ट लावण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी सहायक मोटर वाहन निरीक्षक संजय नकाते व क्षीरसागर तसेच वाहन चालक उपस्थित होते.
