गोंदिया,दि.१४ः- येथील यशोदा सभागृह शास्त्री वार्ड मध्ये मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपैथी जिला गोंदिया महाराष्ट्र व्दारा इलेक्ट्रोहोम्योपैथी चे जनक डॉ काउंट सिझर मैटी यांची 216 वी जयंती मोठ्या आंनदात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.के.जी.तुरकर जिलाध्यक्ष एम ए ईएच गोंदिया तथा सरपंच ग्राम पंचायत तिगांव हे होते.तर दिप प्रज्वलन डॉ सि एच भगत पंचायत समिति सदस्य तथा तालुकाध्यक्ष तिरोड़ा व डॉ अनुराग बाहेकर कार्डियोलाजिस्ट गोंदिया यांच्या हस्ते झाले .
प्रमुख अतिथि म्हणुन डॉ संतोष येवले सचिव एम ए ईएच गोंदिया, डॉ राजेश तिवारी कोषाध्यक्ष एम ए ईएच गोंदिया, डॉ बी ए बावनकुले कार्याध्यक्ष एम ए ईएच गोंदिया, डॉ के बी राणे महासचिव एम ए ईएच गोंदिया, डॉ यादेश्वर अंबुले ईएच तज्ञ एवं वक्ता, डॉ योगेश हरीणखेड़े तालुकाध्यक्ष गोरेगांव, डॉ दिपक बहेकार तालुकाध्यक्ष गोंदिया, डॉ एस एफ कटरे तालुकाध्यक्ष सालेकसा, डॉ सुखदास तरोणे तालुकाध्यक्ष आमगांव, डॉ गणेश बिसेन तालुकासचीव तिरोड़ा, डॉ योगेंद्र परकिलवार तालुकासचीव सालेकसा, डॉ रेवेंद्र बोपचे जिलाध्यक्ष ईएच संगठन बालाघाट, डॉ ओमप्रकाश भैरम उपाध्यक्ष तिरोड़ा, डॉ विनोद भगत तिरोड़ा,व गणमान्य यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाले.
कार्यक्रमात जिलाध्यक्ष डॉ के जी तुरकर यांनी इलेक्ट्रो होम्योपैथी चे जनक डॉ काउंट सिझर मैटी यांचा जिवन परिचय दिला,व इलेक्ट्रो होम्योपैथी च्या शासकिय हालचाली व संघटना वर प्रकाश टाकला.कार्यक्रमात जिल्हातिल असंख्य ईएच वैद्यकिय व्यवसायी डाक्टर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सफलतार्थ कृष्णा पटले व योगेश पारधी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ के.बी.राणे यांनी मांडले. तर मंच संचालन डॉ योगेश हरीणखेड़े व आभार डॉ दयानंद हरीणखेड़े यांनी मानले.