क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार — पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
23
जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न
परभणी, दि. 29  – जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार करण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. बैठकीस आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त धेर्यशील जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, शिक्षणाधिकारी (माध्य.), आशा गरुड, शिक्षणाधिकारी, (प्राथ.) सुनिल पोलास शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी डॉ. माधव शेजुळ हे उपस्थीत होते.
यावेळी जिल्हयातील क्रीडा विभागाचा आढावा घेण्यात आला.जिल्हा क्रीडा संकुल व कार्यालय यांची धोकादायक इमारत पाडणे त्याकरीता महानगर पालिकीची परवानगी घेवुन नवीन इमारत बांधकाम करणे. जिल्हा क्रीडा संकुल व परिसर येथील डागडुजी करणे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील 25 एकर जागा जिल्हा क्रीडा संकुल, परभणी साठी उपलब्ध करुन देणे. जिल्हा क्रीडा संकुल प्रवेशद्वार येथील केलेला आडोसा आणि म हानगरपालिका यांचेकडील असलेला जलतरण तलाव जिल्हा क्रीडा संकुल समितीस चालवण्यासाठी देणेबाबत चर्चा करण्यात आली.