गोंदिया दि. २९ :केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि.26 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यात “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठरोग शोध मोहीम अभियान दि.31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान राबविण्यात येत आहे.या दोन्ही मोहीमेत जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे.
दि.27 जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांचे हस्ते कुष्ठरोग जनजागृती कँलेंडरचे विमोचन करण्यात आले.सदर कँलेंडर दोन्ही मोहिमेत कुष्ठरोग आजाराबाबत जनजागृती करताना महत्वाचे ठरणार असल्याचे डॉ.नितीन वानखेडे यांनी याप्रसंगी सांगितले.
“कुष्ठरोगाबाबत एकत्रित पणे जनजागृती वृद्धींगत करु,त्याबाबतचा गैरसमज दुर करु,व कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती मागे राहणार नाही याची दक्षता घेऊ ” ह्याचा सर्वत्र जागर कँलेंडर मध्ये करण्यात आले असल्याचे सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
सदर कुष्ठरोग जनजागृती कँलेंडरचे विमोचन कार्यक्रमप्रसंगी सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी,सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील,सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल आत्राम,देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,मोरगाव अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावंडे,डॉ.वेदप्रकाश चौरागडे,कुष्ठरोग पर्यवेक्षक विवेक पडोळे यांचे समवेत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.