26.3 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home मराठवाडा/खान्देश १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ज्ञानोपासक महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

१६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ज्ञानोपासक महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

0
29
परभणी, दि. २४ : २५ जानेवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, परभणी व ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. २४) रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य शेख मो. बाबर, उपप्राचार्य लक्ष्मण बनसोडे, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, दत्ता गिनगीने हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जनजागृतीपर गीत व एकपात्री नाटिकेद्वारे मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थिनी कु. भक्ती सुरवसे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाबाबत आपले विचार व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी एका बी.एल.ओ. यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला तसेच नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
श्रीमती अरुणा संगेवार यांनी मतदान नोंदणी प्रक्रिया, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, निवडणूक प्रक्रिया व त्यामधील सुधारणा याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी भारत निवडणूक आयोगाची यावर्षाची टॅगलाईन व थीमनुसार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली