जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
धाराशिव,दि.२३ मार्च-जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते,तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे.पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
मृत व जलसंधारण विभाग धाराशिव व मृत व जलसंधारण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त वतीने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपूर्णतः अभियान २.० अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून श्री.पुजार बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जल योद्धा हनुमंत केंद्रे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड,धाराशिव सारथी जि प शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गोडसे व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती.वैशाली घुगे यांची उपस्थिती होती.





