नॉर्वे आणि इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल यांनी घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

0
6
????????????????????????????????????

मुंबई, दि. 03 : नॉर्वेचे कॉन्सिल जनरल टोर्बेजोन होल्थे आणि इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल सौत सिरींगोरिंगो यांनी आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.बैठकीत नॉर्वे कौन्सिलेट कडून तयार करण्यात येणाऱ्या बिझनेस क्लायमेट सर्व्हेच्या दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबई येथे होणाऱ्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण श्री.होल्थे यांनी उद्योगमंत्री श्री. देसाई यांना दिले.
इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल सौत सिरींगोरिंगो यांनी उद्योगमंत्री श्री. देसाई यांची भेट घेऊन  वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे ११ नोव्हेंबर २०१६ रोजी होणाऱ्या एक्स्पो इंडोनेशिया २०१६ करिता निमंत्रित केले.