साध्वी ऋतंभरादेवींचे भागवत कथायज्ञाची शोभायात्रेने सुरवात

0
10
 मध्यप्रदेशचे मुख्य मंत्री शिवराजसिह चौहान यांची विशेष उपस्थिती

गोंदिया,दि.03 :- गोंदियाच्या वृंदावनधाम परिसरात प्रसिद्ध भागवत कथाकार ऋतूंभरादेवीचे आज पासून साथ दिवस भागवत कथायज्ञानाचे आयोजन करण्यात आले आहे .आज भव्य शोभा यात्रा काढून याची सुरवात करण्यात आली असून मध्यप्रदेशाचे मुख्य मंत्री आणि गोदियाचे जावई शिवराजसिह चौहान व  यांनी या शोभायात्रेत सपत्नीक उपथिती लावत डोक्यावर भागवत पोथी घेऊन शहर भ्रमण केले.

विविध झांकी ,लोककलेचे साद्रीरीकारण करून या भागवत कथायज्ञाची स्थापना वृंदावनधाम परिसरात करण्यात आली असून शोभायात्रेत गोंदिया जिल्या सह महाराष्ट्रात ,मध्यप्रदेश ,छत्तीसगढ राज्यातील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती लावली असून सात दिवस गोंदियात ऋतूंभरादेवीचे भागवत कथापूजन होणार आहे तर या भागवत सप्ताहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग तसेच अनेक मंत्रीगण कथास्थळी भेट देणार आहेत. एवढेच नाही तर देशभरातील विविध संत आणि भाविक साध्वी ऋतंभरादेवींना ऐकण्यासाठी गोंदियात येणार असल्याचे आयोजक संजयसिंग मसानी यांनी सांगितले.आहे विशेष म्हणजे साध्वी ऋतंभरादेवी यांचे सप्ताहभराचे भागवत विदर्भात पहिल्यांदाच होत असल्यामुळे गोंदियावासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात हे भागवत चालणार आहे.
विशेष म्हणजे या भागवत कथायज्ञाचे आयोजन मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या सासरकडून करण्यात आले असून कुणाकडूनही यासाठी वर्गणी किंवा सहकार्य घेण्यात आलेले नाही.चौव्हाण यांचे साळे संजयसिंह यांनी या कार्यक्रमासाठी स्वतःपुढाकार घेत नियोजन केले आहे.विशेष म्हणजे दरदिवशी रात्रीला होणार्या एका भजनसंध्येसाठी सुमारे 10 लाखरुपये खर्च होणार असल्याची चर्चा असून फक्त भजनसंध्येवरच 50 लाखाच्यावर खर्च होणार आहे.गावखेड्यातून नागरिकांना आणण्यासाठी सुध्दा बसेसची व्यवस्था असून यावरही लाखोचा खर्च होणार आहे.हा महायज्ञ कोट्य़ावधीचा खर्च करुन साजरा होत असल्याचे आयोजकांनीच दिलेल्या माहितीवरुन दिसून येत असून या धार्मिक कार्यक्रमासाठी मध्यप्रदेश सरकारचे विशेष सहकार्य असल्याची चर्चा आहे.सोबतच आयोजनासाठी गेल्या महिन्याभरापासून गोंदियातच तळ ठोकून बसलेले संजय सिह यांचा गोंदियाच्या सक्रीय राजकारणाचा प्रवेश या माध्यमातून होणार असल्याचेही बोलले जात असून पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जात आहेत.
आज या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन ,श्रीमती रेखा बिसेन,खासदार नाना पटोले,नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,शहर भाजपाध्यक्ष सुनिल केलनका,राजू वालिया,भिकम शर्मा,मधुसूदन अग्रवाल,शिव शर्मा,गु्ड्डू कारडा,नविन नशिने, शहरातील गनमान्य नागरीक व मध्यप्रदेश व छ्त्तीसगडमधील काही मान्यवर सहभागी झाले होते.