परदेशातील गुंतवणुकीबाबत 20 बड्या उद्योजकांवर ‘इडी’कडून गुन्हे दाखल

0
13

नवी दिल्ली: देशातील 20 बड्या उद्योगपतींविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने फेमा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परदेशातील एका आयलंडवर बेकायदेशीर पद्धतीने पैसे कमावणे तसंच कंपनी बनविणे व गुंतवणूक केल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल केले आहेत.

इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणजेच ICJI ने यांच्या नावांचा खुलासा केला होता. त्यानंतर उत्पन्न विभागाने त्यांची चौकशी केली होती. त्यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सर्वांवर ब्रिटीश वर्जिन आयलंडवर तथाकथित संपत्ती खरेदी करणे, कंपनी बनविणे आणि त्यावर पैसे गुंतवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) पाठिवलेल्या नोटीसमध्ये भारतीय कंपनी आणि विदेशी कंपन्यांच्या माहितीचा तपशिल मागवला आहे. याशिवाय परदेशात असलेली स्थिर व जंगम मालमत्ता आणि परदेश दौऱ्यांचा तपशिलही या उद्योजकांकडून मागवण्यात आला आहे.

सर्व उद्योगपतींची प्राथमिक माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

या उद्योजकांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत –

रविकांत रूईया- एस्सार ग्रुप
ओसवाल ग्रुप – अभय ओसवाल
डाबर ग्रुप – चेतन बर्मन
सत्यम ग्रुप- तेजा राजू
किंगफिशर – विजय मल्ल्या
प्रिमिअर अॅटोमोबाईल – मैत्रेय विनोद दोषी
ग्रीन प्लाय- सौरभ मित्तल
ओनिडा – सोनी सोनू मीरचंदानी
यूके पेटेंस – गुरूबचन धींगरा
डायमंड ट्रेडर्स, मुंबई – किर्तीलाल मेहता आणि भाविन रश्मी मेहता
बडोद्याचे – समरजीत सिंह
चमांग टी एक्स्पोर्ट – यशोवर्धन लोहिया
समीर मोदी
मिनाक्षी जटिया
सुनीत खटाऊ कुटुंबातल्या तीन लोकांच्या नावाचा उल्लेख