जम्मू-काश्मिरमध्ये अब्दुल्लांना धक्का, तर झारखंडमध्ये मोदी मॅजिक

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : जम्मू काश्मिर आणि झारखंड विधानसभेसाठी आज मतदान पार पडलं. या मतदानानंतर विविध एक्झिट पोल समोर येत आहेत.

जम्मू काश्मिर

जम्मू- काश्मिरमध्ये उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील नॅशनल कॉन्फरन्स सरकारला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे. मात्र इथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे.

सी व्होटरनं केलेल्या एक्झिटपोलमध्ये हा अंदाज व्यक्त केला आहे.

जम्मू- काश्मिर विधानसभा 87 सदस्य संख्येची आहे. यामध्ये मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असेल.

मात्र सध्या सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स अर्थात एनसीला लोकांना नाकारल्याचं दिसतंय.

जम्मू काश्मिर एक्झिट पोल

पक्ष जागांचा अंदाज

पीडीपी : 32 ते 38 जागा
भाजप : 27 ते 33 जागा
नॅशनल कॉन्फरन्स : 8 ते 14 जागा
काँग्रेस : 4 ते 10 जागा
अपक्ष/ इतर : 02 ते 08गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने 28 जागांवर बाजी मारली होती. तर पीडीपी 21, भाजप 11, काँग्रेस 17 आणि अपक्ष व इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या.

झारखंड एक्झिट पोल

झारखंडमध्ये मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिल्याचं चित्र आहे. 81 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजप आणि मित्रपक्षांना तब्बल 52 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं झारखंडमध्ये भाजपची सत्ता नक्की मानली जात आहे. एकट्या भाजपच्या खात्यात 46 जागा मिळतील असा अंदाज आहे.

एबीपी न्यूज आणि नेल्सनच्या एक्झिटपोलमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

पक्ष – जागांचा अंदाज

भाजप – 52
काँग्रेस – 09
झारखंड मुक्ती मोर्चा – 10
(जेएमएम)
झारखंड विकास मोर्चा – 06
अपक्ष आणि इतर – 04
——-
एकूण – 81