मुंबई – सलग दुस-या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली असून, सोमवारी सकाळी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्समध्ये २६५ अंकांची वाढ झाली. धातू, बांधकाम आणि वाहन उद्योगाच्या शेअर्समध्ये तेजी आहे.
मागच्या सत्रामध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये ३३ अंकांची वाढ झाली होती. २६५ अंकांच्या वाढीसह मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सध्या २७,५०७ अंकांवर आहे. बीएसई सेन्सेक्समधील वाढीचा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवरही सकारात्मक परिणाम झाला आहे. निफ्टी ७८ अंकांच्या वाढीसह सध्या ८२७९ अंकांवर आहे.
अन्य आशियाई शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण आहे. नाताळची सुट्टी असल्याने सध्या शेअर बाजारातील गुंवतणूक कमी झाली आहे. नववर्षाच्या पहिल्या आठवडयापासून पुन्हा बाजारात गुंतवणूकीचा ओघ वाढेल असे बाजार तज्ञांनी सांगितले.