मुंबई : मोबाईल फोनऐवजी कधी साबण, कधी दगड तर कधी लाकडाचे तुकडे पाठवणाऱ्या स्नॅपडीलने आणखी एक नवा पराक्रम केला आहे. स्नॅपडीलवरून 84 हजार रुपयांच्या ‘मॅकबुक’ची ऑर्डर केली असता, 600 रुपयांचा हिटर पंखा ग्राहकाच्या हाती सोपवण्यात आला.
मुंबईतील नितीन छाब्रिया यांनी 5 जानेवारीला ‘स्नॅपडील डॉट कॉम’वरून ‘मॅकबुक’ची ऑर्डर केली होती. मॅकबुकचे 84 हजार त्यांनी क्रेडिट कार्डद्वारे पे केले होते. मात्र त्यांच्याकडे ‘स्नॅपडील’चं कुरिअर आलं, तेव्हा त्यांना बॉक्समध्ये मॅकबुकऐवजी चक्क हीटर पंखा पाहून धक्काच बसला.
नितीन यांनी याबाबतची माहिती व्हिडीओसह फेसबुकवर पोस्ट केली. त्यानंतर याची माहिती स्नॅपडीलला दिली. स्नॅपडीलला झाला प्रकार लक्षात आला. स्नॅपडीलकडून त्यांना मॅकबुक दिला जाईल, असं सांगण्यात आलं.
त्यानंतर नितीन यांनी ‘मॅकबुक’ मिळाल्याची पोस्ट आज फेसबुकवर केली आहे.
यापूर्वीही स्नॅपडीलने असेच पराक्रम गाजवले आहेत. मोबाईल फोनऐवजी कोणाला साबण, तर कोणाला दगड पाठवल्याचं यापूर्वी आपण पाहिलंच आहे.