मोटार सायकल रॅलीने भीमा कोरेगावच्या शहिदांना अभिवादन

0
17

नांदेड ( सय्यद  रियाज ),दि.1ः- देशभरातील दलित समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे आज शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. आज या घटनेला 200 वर्ष पुर्ण झाल्याने व्दिशताब्दी महोत्सवासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय भीमा कोरेगाव येथे दाखल झाला आहे.तर नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा विजय असो,भीमा कोरेगावचा घेऊ धडा,नवी पेशवाई मातीत गाडा !तसेच जयभीमच्या जयघोषाने बिलोली शहर दूमदूमले होते.

हि रॅली विजय नगर टोलनाक्यापासून ते गाँधी चौक मार्ग काढून रॅलीचे तहसील कार्यालयासमोर मोठ्या अभिवादन सभेत रुपांतर झाले.यात अनेकांनी मनोगत व्यक्त केले. इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी भीमा कोरेगावची पार्श्वभूमी व 1818 च्या लढाईच्या पुनरावृत्ती होण्याचे संकेत देत संघावर कडाडून टीका केली.वारणेचा वाघ संघटना प्रमुख गौतम भालेराव,किरण डोंगरे,राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष मुन्ना पोवाडे,माजी नगराध्यक्ष संजय जाधव ,दैनिक सामना प्रतिनिधि रत्नाकर जाधव,शेख पाशाभाई,व आदिंनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचलन नगरसेवक प्रकाश पोवाडे यांनी केले.आयोजनासाठी प्रकाश पोवाडे,संजय जाधव,भारीपचे ता.अध्यक्ष धम्मदीप गावंडे, कार्याध्यक्ष मोहन जाधव,कुणाल लोहगावकर,कॉँग्रेसचे संदेश जाधव,विजय प्रचंड,रत्नाकर जाधव ,सय्यद रियाज ,संजयकुमार पोवाडे,यादव लोकडे,प्रा.मारोती भदरगे,माधव एडके,आकाश सोनकांबळे,शेषेराव जेठे,रमेश विचारे,दिलीप घाटे,महेंद्र प्रचंड,सुनील प्रचंड,अनिल दावलेकर,सुनील कदम,शिवराज सूर्यकर,संघपाल जाधव,संजय पोवाडे,राज पवार,सुदाम कांबळे,नवदीप डाकोरे,बालाजी डोंगरे,रोहित वाघमारे,मनोहर लाखे,किरण लाखे व शेकडो भीमसैनीक यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रकाश पोवाडे यांनी मानले.

1 जानेवारी 1818 रोजी पेशव्यांच्या विरुद्धच्या युद्धात हुताम्या झालेल्या 500 महार बटालियनच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आजचा शौर्य/विजय दिन साजरा करण्यात येतो. 1 जानेवारी 1818 रोजी पेशवे आणि ब्रिटिश यांच्यात भीमा कोरेगाव येथे घमासान युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांकडून लढणा-या 500 महार बटालियनच्या सैनिकांनी पेशव्याचा दारूण पराभव केला होता. याचाच भाग म्हणून इंग्रजांनी तेथे एक विजय स्तंभ उभा केला आहे. तेव्हापासून भीमा कोरेगाव येथे शौर्यशाली महार सैनिकांना अभिवादन करण्याकरीता राज्यभरातील भीम सैनिक भीमा कोरेगांव येथे येत असतात. आजही विजयस्तंभाला पुष्प अर्पण करण्यासाठी हजारो दलित बांधव पोहचले आहेत.