गोंदिया बल्लारशाह मार्गावर नववर्षारंभी रेल्वेच्या धडकेत दोन हरीण ठार

0
34

गोरेगाव,दि.1ः- गोंदिया- बल्लारशाह रेल्वेमार्गावर असलेल्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार रेल्वेस्थानकालगत रेल्वेगाडीचा धक्का लागून दोन हरीण ठार झाल्याची घटना आज  1 जानेवारीला सकाळी घडली. गोंदिया-बल्लारशाह या पॅसेंजर गाडीखाली सकाळी 7.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागात नवेगाव बांध हा वनसंरक्षित प्रदेश असून येथे हरणांचा बाहेर वावर नेहमीच आढळून येतो. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर पोचून हरणांचा पंचनामा करीत मृत हरणाची उत्तरीय तपासणी केली.