मावळत्या सीईओ ठाकरेंना निरोप,तर नव्या सीईओं दयानिधीचे स्वागत

0
9

गोंदिया,दि.०१ः गोंदिया जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज दुपारच्या सुमारास राजुराचे उपविभागीय अधिकारी व २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी एम.आर.दयानिधी यांनी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी रqवद्र ठाकरे यांच्याकडून पदभार स्विकारला.त्यापुर्वी मावळते सीईओ ठाकरे यांनी दयानिधी यांचे स्वागत करीत त्यांना खुर्चीसोपविली.ठाकरे यांनी सर्व अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांनी ८ महिन्यात केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले.यावेळी गोंदिया जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्यावतीने ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर नवे सीईओ दयानिधी यांचेही पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.पदभार स्विकारल्यानंतर दयानिधी यांनी सर्व विभागप्रमुख,आठही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी सवांद साधला आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांची ओळख करुन घेतली.सर्व विभागप्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.