जात वैधता नसलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करा

0
12
भाजपाचे माजी जि.प. सदस्य हायगलेंची मागणी
 बिलोली,दि.13ःः तालुक्यातील 13 सदस्यसंख्या असलेल्या  कासराळी येथील ग्राम पंचायत मधील आरक्षित जागेवर विजयी झालेल्या सदस्यांनी मुदत उलटुनही अद्याप जात वैधता प्रमाणपञ दाखल केला नाही अशा न केल्याने सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हा परीषद सदस्य संग्राम पाटील हायगले यांनी  जिल्हाधिका-यांकडे मंगळवारी केली आहे.
    बिलोली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या व माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे वर्चस्व नेहमीच राहत  असलेल्या कासराळी येथील ग्रामपंचायतची  निवडणुक साधारण दोन वर्षापूर्वी  झाली.ज्यात 11 सदस्य ठक्करवाड गटाचे विजयी झाले.ज्यात बहुतांश  सदस्य हे राखीव जागेवर विजयी झाले. माञ यापैकी 6 सदस्यांनी जातवैधता प्रमाणपञ अजुन पर्यंत सादर केला नाही .तसे पाहीले तर  विजयी झाल्यानंतर 6 महीन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपञ दाखल करणे बंधनकारक आहे माञ  दोन वर्षे उलटुनही जातवैधता प्रमाणपञ बहुतांश सदस्यांनी दाखल केला नाही .जातवैधता दाखल न करु शकलेल्या कासराळी येथील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी भाजपाचे माजी जि.प.सदस्य संग्राम पाटील  हायगले यांनी जिल्हाधिका-यांकडे   दिलेल्या एका  निवेदनात केला  आहे.