26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home मराठवाडा/खान्देश बिलोली येथे आज महावितरण कंपनीच्या बैठकीचे आयोजन

बिलोली येथे आज महावितरण कंपनीच्या बैठकीचे आयोजन

0
24
बिलोली,दि.20ःः तालुक्यातील सीमावर्ती भागातील प वीज विषय प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील विज विषयक प्रश्न समजून घेण्यासाठी दिनांक २० ऑक्टोंबर रोज शनिवारी दुपारी बारा वाजता बिलोली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सीमावर्ती भागाचे प्रश्न मांडण्यात आले होते यावेळी विज या विषयावर ग्रामीण भागातील प्रश्न नमूद करण्यात आले होते. सीमावर्ती भागातील प्रश्न समजून घेण्यासाठी बिलोली येथे स्वतंत्र बैठक घेण्यात यावी अशी अपेक्षा प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आणि वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या सूचनेनुसार  कार्यकारी अभियंता यांनी ही बैठक बोलावली आहे. सीमावर्ती भागातील जनतेने या बैठकीत उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आणि बिलोली येथील साहाय्यक अभियंता यांनी केले आहे.