रविवारी नांदेड येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची महत्वाची बैठक

0
15
 नांदेड. दि. १८ : : पद्मश्री विठलराव विखे पाटील कृषी परिषदेची राज्य कार्यकारिणीची व महत्वाच्या पदाधिकारी आढावा बैठक रविवार 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित केली असल्याची प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी क्रीडा महोत्सवामध्ये सिल्वर पदक मिळालेल्या रवी जाधव यांचा व  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठाने विठ्ठल पावडे यांना पीएचडी प्रदान केल्याबद्दल दोघांचाही विशेष सत्कार यावेळी बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीची इतर पदाची निवड यावेळी करण्यात येणार आहे .राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.बैठकीत कृषी परिषदेच्या पुढील ध्येय धोरणविषयी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रशांत आबादार रामदास पाटील माळेगावे, परमेश्वर काळे यांनी केले आहे.