संखचे डॉ.भाऊसाहेब पवार संत कबीर समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
19

संख(राजेभक्षर जमादार),दि.27ः-येथील प्रगतशील शेतकरी डॉ.भाऊसाहेब पवार यांना *संत कबीर समाजरत्न गौरव पुरस्कार २०१९सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. पिपल्स रिपब्लीकन पार्टी,प्रणित रिपब्लीकन युथ फोर्स सांगली जिल्हा यांच्यावतीने हा पुरस्कार दरवर्षी प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात येतो .यंदा संखचे प्रगतशील शेतकरी डॉ .भाऊसाहेब रामचंद्र पवार संख यांना माजी केद्रिंय मंत्री प्रतीक पाटील ,पीआरपीचे जयदिपजी कवाडे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आला. संख येथील डाळिंब उत्पादक शेतकरी डॉ .भाऊसाहेब पवार यांनी वैद्यकीय क्षेत्रातून निवृती घेत शेतीत मातीतून मोती कमिवले आहेत.खडकाळ,तेल्या,बिब्या सारख्या महाभयानक रोगावर मात कर कोट्यावधीचे डाळिंब उत्पादन घेत शेतीत आदर्श निर्माण केला आहे.वनस्पतीचे डॉक्टर म्हणून डाळिंब रोपावर योग्य औषधे ,पाणी व त्यांची निगा घेत त्यांनी डाळिंब बागा संपत असताना वर्षाला ५० लाखापर्यत उत्पादन घेतले आहे.याशिवाय त्यांचे सामाजिक कार्य संखसह परिसरातील मसीहा ,दानसूरपणा सर्वश्रूत आहे.ते स्वतः देणगी देत सामजहिताची कामे करतात संख परिसरातील धार्मिक सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ .पवार यांचा सहभाग निश्चित असतो.
लाखो रूपयांच्या देणग्या त्यांनी समाजकार्यासाठी दिल्या आहे.कायम समाजतील तळागाळातील लोंकाना मदत करत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांची ताळमळ कायम असते. यांची दखल घेत पीपल्स रिपब्लिक पार्टीच्या वतीने संत कबीर समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.सांगली येथे भरगच्च कार्यक्रमात त्यांना विविध मान्यवराच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी संख शेतकरी संघटनाचे अध्यक्ष नागनाथ शिळीन ,युशुनाथ पाटील ,भाऊराया बिरादार ,कुमार बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते . या पुरस्काराबद्दल डॉ .भाऊसाहेब पवार यांचे अभिनंदन होत आहे.