प्रभाग १0 च्या विकासासाठी २ कोटींच्या निधी-देवेंद्र टेंभरे

0
45

अर्जुनी मोर,दि.27ः- नगर पंचायत अर्जुनी मोरचे भाजपाचे नगरसेवक तथा गटनेता देवेंद्र टेंभरे यांचे विशेष प्रयत्नाने प्रभाग क्र. १0 चा कायापलट होणार असून १४ सिमेंट रस्ते व नालीबांधकामाला २ कोटी रूपयांच्या निधीला गोंदियाच्या जिल्हाधिकारी यांनी २२ फेब्रुवारीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे अर्जुनी मोर नगर पंचायतीच्या प्रभाग १0 मध्ये सिमेंट रस्ते व नाल्यांची झगमगाट होणार आहे.
अर्जुनी मोर भाजपाचे प्रभाग १0 चे नगरसेवक तथा नगरपंचायतचे गट नेते देवेंद्र टेंभरे यांनी आपल्या प्रभागासह अर्जुनी मोर शहराचा विकास करण्यासंदर्भात पाऊले उचलली असून त्यांनी विधानपरिषद सदस्य परिणय फुके व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांचेकडे सतत विकासकामाच्या निधी साठी पाठपुरावा केला. त्यांचे प्रयत्नांना यश आले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्‍वासू असलेले नगरसेवक व गटनेते देवेंद्र टेंभरे यांनी आपल्या प्रभाग १0 साठी नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत नगरपंचायत अर्जुनी मोर येथील प्रभाग १0 मधील एकूण १४ सिमेंट रस्ते नालीसह २ कोटी ४६ हजार ७७५ रूपये निधी मिळविला व त्या कामांना प्रशासकीय मान्यता ही मिळाली आहे.
यापूर्वीही गटनेता देवेंद्र टेंभरे यांनी नगर पंचायतच्या स्थानीक विकास निधी व ना. राजकुमार बडोले यांचे मदतीने विविध विकासकामे आपल्या प्रभागासह अर्जुनी मोर शहरात आणले आहे. भविष्यात सात कोटी रूपयाचा विकास कामाचा आराखडा देवेंद्र टेंभरे यांचेकडे तयार असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. टेंभरे यांचे विकासाच्या झंझावाने प्रभागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.