37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना लाभार्थी निवडीसाठी आज जाहीर सोडत

जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना लाभार्थी निवडीसाठी आज जाहीर सोडत

0
74

वाशिम, दि. २7 : जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेबाबत मृद व जलसंधारण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या २९ ऑक्टोंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार प्राधान्यक्रमाचा विचार न करता सर्व प्रकारातील पात्र अर्जांमधून सोडत काढून उर्वरित लक्षांक पूर्ण करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्याचा उर्वरित लक्षांक पूर्ण करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती प्रवर्गातील प्रतीक्षाधीन यादीमधील अर्जदार आणि शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगार सहकारी संस्था, नोंदणीकृत गटशेती, विविध कार्यकारी सहकारी संस्था आदी इतर पात्र अर्जदारांमधून अंतिम लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली आज, २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, कक्ष क्र. १०६, काटा रोड, वाशिम येथे जाहीर सोडत आयोजित करण्यात आली आहे. तरी या सोडतीकरिता सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती प्रवर्गातील अर्जदारांपैकी पूर्वीच्या सोडतीद्वारे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट लाभार्थी तसेच इतर शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगार सहकारी संस्था, नोंदणीकृत गटशेती, विविध कार्यकारी सहकारी संस्था प्रकारातील अर्जदारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक निबंधक (प्रशासन) तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय निवड समिती यांनी केले आहे.

blank