१४ मे रोजी सर्वत्र वासवी जन्मोत्सव साजरा करा- महासभेचे आवाहन

0
35
नांदेड,दि.11 -आर्य वैश्य कोमटी समाजाची कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी यांच्या जन्मोत्सवा चा कार्यक्रम राज्यात दिनांक 14 मे रोजी  सर्वत्र साजरा करण्याचे आवाहन
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष  नंदकुमार गादेवार यांनी केले आहे.नांदेड येथील सिडको भागातील वासवी भवन येथे राज्यातील प्रमुख पदाधिकारी भानूदास वट्टमवार, गोविंद बिडवई, सुभाष कन्नावार,दिलीप कंदकुर्त, सुर्यकांत शिरपेवार, प्रदीप कोकडवार, सुर्यकांत कोकड, राजू आसेगावकर, सुरेश रूद्रवार,गजानन डुबे,नितीन वट्टमवार, सचिन गुंडेवार,विलासराव डुबे, डॉ किरण चिद्रावार, विजय कुंचनवार आदीसह लातूर, बीड,उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, पुणे, पंढरपुर, मुंबई,गावा गावातील अध्यक्ष आणि गाव स्तरापर्यंत कार्य करण्याऱ्या समाज बांधवांची उपस्थिति होती.
वासवी माता जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे  आयोजन राज्यातील अनेक गावांत केले जाते.
शोभायात्रा,  पारायण, मिरवणुका, १०२ गोत्र समाज बांधवा कडून महाभिषेक, पूजन, कुंकम अर्चना, रक्तदान शिबिरे, आरोग्य, आदी  कार्यक्रम घेतले जावे. नांदेडसह नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, पुणे, मुंबई, परभणी, हिंगोली, लातूर, औरंगाबाद, आदी जिल्ह्यात भव्य कार्यक्रमाचे नियोजन झाले आहे.नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात समाज असून त्या ठिकाणी पण जन्मोत्सव आनंदात साजरा करावा. बैठकीत सूत्रसंचालन नरेंद्र येरावार यांनी केले.