29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश मॉब लिंचिग विरोधात कायदा करीत मुस्लीमांना अट्रासिटीचे संरक्षण मिळावे-तहसीलदारांना निवेदन

मॉब लिंचिग विरोधात कायदा करीत मुस्लीमांना अट्रासिटीचे संरक्षण मिळावे-तहसीलदारांना निवेदन

0
28

आटपाडी ,दि.४ : मॉब लिंचिग विरोधात कडक कायदा करीत मुस्लीमांना अॅट्रासिटीचे संरक्षण देत सरकारने झारखंड मध्ये जमावाकडून हत्या केलेल्या तबरेज अन्सारीला न्याय दयावा आणि अन्याय कर्त्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना विविध धर्मीयांकडून देण्यात आले . मुस्लीम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र ,मुस्लीम अधिकार आंदोलन महाराष्ट्र , भारीप बहुजन तथा वंचित बहुजन आघाडी ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , मुस्लीम खाटीक समाज महाराष्ट्र, या पक्ष ,संघटना बरोबरच मुस्लिम ,हिंदू ,बौद्ध धर्मीय नेते ,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .तहसीलदार श्री सचिन लंगुटे यांनी निवेदन स्विकारून शासनाकडे भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले . यावेळी मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते सादिक खाटीक ,मुस्लीम समाजाचे नेते मंजुरभाई अत्तार ,मुस्लीम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्राचे सांगली जिल्हाध्यक्ष सुरज पठाण , मुस्लीम अधिकार आंदोलनचे आटपाडी तालुकाध्यक्ष मोहसीन तांबोळी , वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे ,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरज पाटील ,जालीदर कटरे ,युवक अध्यक्ष अमित ऐवळे , राष्ट्रवादी पदवीधरचे जिल्हा उपाध्यक्ष शफीक तांबोळी खरसुंडी , दिघंचीचे युवा नेते अमित वाघमारे , अजित सरतापे राजेवाडी , नवनाथ जावीर ,नितीन डांगे , रियाज शेख ,अजमुद्दीन इनामदार ,सादिक सत्तार मुलाणी ,आटपाडी ,आसद मुलाणी , विनोद बनसोडे , फिरोज झारी,मुजफ्फर अत्तार ,शाहरूख जमादार , कागज शेख , दयानंद ऐवळे ,पिंटू ऐवळे ,दादासाहेब कदम , दिगंबर लोहार ,अमित मोरे पाटील , तानाजी सातपूते ,कैलास गळवे , संतोष सावंत इत्यादी अनेक जण उपस्थित होते .