सोलापूर(आमीर मुलाणी)दि.26ः माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलिस स्टेशन येथे नव्याने रूजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक जाधव साहेब यांचा सत्कार दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा नगमाताई शिवपालक यांच्या हस्ते करण्यात आला. वेळापूर शहरात शांतता व सुव्यवस्था तसेच अवैध धंदे बंद करण्यात बाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्या संदर्भात योग्य ती दखल घेतली जाईल असे सांगण्यात आले. या अगोदर येथे कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक शिरीष माणगावे साहेब यांची वळसंग ता. अक्कलकोट येथे बदली झाली आहे.यावेळी नगमाताई शिवपालक, लहुजी शक्ती सेनेचे सुनिल साठे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




