जळगाव,दि.30ःःजळगाव येथील समाज सेविका, सेवक सेवाभावी संस्था ग्रुपच्या सदस्या महाराष्ट्र सखी सम्राज्ञी,मिसेस जळगाव 2019 रणरागिणी पुरस्कार प्राप्त सौ.कल्पना गणेश वर्मा यांची कोलकाता येथे होणार्या मिसेस इण्डिया 2019 च्या अतिंम फेरीत निवड झाली आहे. विशेष गौरवाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून 4 महिलांची निवड करण्यात आली. त्यापैंकी 3 स्पर्धक मुंबईतील व एकमात्र स्पर्धक कल्पना वर्मा या जळगाव शहरातून आहे.या स्पर्धेमध्ये 1000 स्पर्धकातून अतिंम फेरी मध्ये 19 महिला पात्र ठरल्या.त्या अतिंम 19 मध्ये कल्पना वर्मा यांचा ही समावेश आहे. त्यांचे प्रा. डॉ. स्मिता गिरी यांनी अभिनंदन केले.




