महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा येत्या संयुक्त बैठकीत सुटणार

0
4

■ कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांची माहिती

देवरी,दि.२५: आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातील तिढा येत्या २७, २८, २९ फेब्रुवारी होणाऱ्या संयुक्त बैठकीत सुटणार आहे. जागा वाटपाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी जे ठरेल, ते आघाडी धर्मानुसार पाळले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवार (दि.२३ फेब्रुवारी) रोजी देवरी येथे आमदार कोरोटे यांच्या निवासंस्थानी भेटी दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलतानी दिली.
नाना पटोले हे कचारगड येथे सुरू असलेल्या कोयापुनेम महोत्सवात सहभागी होण्यासाठी शुक्रवार रोजी आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्रात आले होते. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. पटोले पुढे म्हणाले, भाजप सरकार सर्वसामान्य नागरिक, मध्यवर्गीय कर्मचारी तसेच देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकरी विरोधी आहे. हक्कासाठी लढा उभारत असतानाही त्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. उलट आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना खालिस्तानी, आंदोलनजिवी म्हणून संबोधले जात आहे. यावरून हे भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

लोकसभा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गोंदिया, भंडारा व चिमूर, गडचिरोली जिल्ह्यात पंजा हे चिन्ह उमेद्वाराच्या माध्यमातून दिसून आले नव्हते. मात्र आगामी निवडणुकीत निश्चितपणे काँग्रेसचे पंजा हे निवडणूक चिन्ह दिसून येणार आहे, असे सांगत त्यांनी दोन्ही लोकसभा जागेवर काँग्रेस निवडणूक लढविणार, असल्याची माहिती दिली. असे असले तरी महाराष्ट्रातील किती जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष लढविणार, हे बैठकीनंतरच निश्चित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार कोरोटे यांच्या निवास स्थानी नानाभाऊ पटोले यांचा स्वागत व सत्कार करण्यात आले.त्यांच्यासोबत आमगाव-देवरीचे आमदार सहसराम कोरोटे,सीमा कोरोटे,कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गोंदिया जिल्हा आदिवासी सेलचे अध्यक्ष सोनु नेताम, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे महासचिव नामदेवराव किरसान, तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, महिला तालुकाध्यक्ष सुनंदा बहेकार, शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, महिला शहराध्यक्ष मीना राऊत, जि.प.सदस्य उषा शहारे, राधिका धरमगुडे, पं.स.सदस्य रंजित कासम, प्रल्हाद सलामे, भारती सलामे, अनुसया सलामे, माजी जि.प. सदस्य राजेश चांदेवार, देवरीचे नगरसेवक सरबजीतसिंग(शैंकी) भाटिया, मोहन डोंगरे,नितीन मेश्राम,शकील कुरेशी,नगरसेविका सुनिता शाहू, सुरेन्द्र बन्सोड यांच्यासह देवरी तालुका कांग्रेस कमेटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.