63 वर्षांचा आयकर कायदा इतिहासजमा होणार, नवीन विधेयक लवकरच सादर होणार

0
55

63 वर्षांपासून अंमलात असलेला आयकर कायदा लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन आयकर विधेयक सादर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच करप्रणालीत मोठे बदल अपेक्षित आहेत.

नवीन विधेयकाची तयारी :

या नवीन विधेयकासाठी तज्ज्ञांची समिती गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहे. प्रस्तावित कायदा दोन ते तीन भागांमध्ये विभागलेला असेल आणि सध्याच्या कायद्यातील क्लिष्टता कमी करून तो अधिक सोपा आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला जाईल.

Income Tax Act l नवीन कायद्याचे फायदे :

नवीन आयकर कायदा व्यक्ती, संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यासाठी अनेक फायदे घेऊन येईल. सध्याच्या कायद्यातील त्रुटींमुळे होणारे न्यायालयीन खटले कमी होतील, असा विश्वास आहे. तसेच, करप्रणाली अधिक पारदर्शक आणि वापरण्यास सोपी होईल, ज्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळेल.

या बिलासाठी तज्ज्ञांची एक समिती अगोदरच गठीत केली आहे. ही नवीन कायदा हा दोन अथवा तीन भागात असेल. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून कसरत सुरू होती. सरकार याविषयीचे बिल, विधेयक सादर करणार आहे. त्यानंतर करदाते आणि तज्ज्ञांच्या हरकती, प्रतिक्रियेनंतर त्यात सुधारणा करण्यात येईल. आता या नवीन आयकर कायद्यामुळे जुना कायदा इतिहासजमा मानण्यात येत आहे.

नवीन आयकर कायदा हा करप्रणालीत एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो. यामुळे करदात्यांना अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे.