24.4 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home राष्ट्रीय देश शिक्षणमंत्री इराणींच्या पत्रात ‘स्पेलिंग’च्या चुका

शिक्षणमंत्री इराणींच्या पत्रात ‘स्पेलिंग’च्या चुका

0
26

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२१: देशाच्या केंद्रीय शिक्षण व मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या लेटरहेडमध्ये स्पेलिंगच्या चुका आढळून आल्याने त्यांच्यावर सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.

देशातील शिक्षकांना स्मृती इराणी यांच्या सहीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या लेटरहेडवर ‘MINISTER‘ ऐवजी ‘MINSTER‘ व ‘संसाधन‘ ऐवजी ‘संसाधान‘ असे छापण्यात आले आहे.

शिक्षण मंत्र्यांच्याच लेटरहेडवर चुका आढळून आल्याने त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून हे पत्र फिरत असून, नेटिझन्सनी टीकेचा सूर आळवला आहे.

blank