वृत्तसंस्था
चेन्नई -दि.४:- तमीलनाडूच्या कड्डालोरमध्ये आज (शुक्रवार) पहाटे 2 वाजताच्या सुमारास चेन्नई-मंगलोर एक्स्प्रेस (क्रमांक 16859 Chennai Egmore-Mangalore) रुळावरून घसरली. यामध्ये 38 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये 25 महिलांचा समावेश आहे.
हा अपघात पूवनूर रेल्वे स्टेशनच्या जवळ घडला. अपघातग्रस्तांना जवळच्याच एका रुग्णालयात भरती करण्यात आले. कड्डलोरचे जिल्हाधिकारी एस. सुरेशकुमार यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.