शासकीय रक्तपेढीने दिले चुकीचे रक्तगट

0
12

गोंदिया,दि.4 : महिला एक आणि रक्तगट दोन हा प्रकारच डोक्याला ताप आणणारा आहे. बाई गंगाबाई रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीने एका महिलेची रक्त तपासणी केली. त्यात ओ पॉझिटिव्ह दाखविण्यात आले. पुन्हा त्याच महिलेची हेडगेवार रक्तपेढीत तक्त तपासणी करण्यात आली, त्यात ए पॉझिटिव्ह रक्तगट दाखविण्यात आले. ही तङ्कावत पाहता, शासकीय रक्तपेढीचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, आरोग्याशी खेळणाèया शासकीय रक्तपेढी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेच्या नातेवाइकांनी केली आहे.
तिरोडा तालुक्याच्या खडकी डोंगरगाव येथील सविता शिशुपाल पटले या महिलेला मंगळवारी (दि. १) डाकराम सुकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृती अधिक खालावल्याने तिला काल, बुधवारी गोंदियाच्या बाई गंगाबाई जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी सविताला रक्ताची गरज भासत असल्याचे सांगितले. त्यानुसार शासकीय रक्तपेढीत तिचा रक्तगट तपासण्यात आला. त्यावेळी ओ पॉझिटिव्ह रक्तगट असल्याचे रक्तपेढीकडून सांगण्यात आले. ओ पॉझिटिव्ह रक्त आणण्यासाठी तिचे नातेवाईक गेले असताना हेडगेवार रक्तपेढीत पुन्हा तिच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली. तिथे मात्र, डोक्याला ताप येईल, असाच प्रकार उघड झाला. त्या महिलेचे रक्तगट ओ पॉझिटिव्ह नसून ए पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या रक्तगटाच्या तङ्कावतीमुळे शासकीय रक्तपेढीचा गलथानपणा उघड झाला आहे. गोरगरिबांसाठी जीवनदायी ठरणाèया बाई गंगाबाई रुग्णालयात आता रुग्णांच्याच आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. दरम्यान, महिलेच्या आरोग्याशी खेळणाèया रक्तपेढी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेच्या नातेवाइकांनी केली आहे.