छत्रपती विद्यालयात सायकल वाटप

0
16

आमगाव,दि.४ -तालुक्यातील ग्राम सितेपार येथील छत्रपती विद्यालयात विद्याथ्र्यांना मानव विकास योजनेतून सायकल देण्याची तरतूद आहे. त्यातून इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष तसेच मुख्याध्यापक एम.एस. पटले, सहायक शिक्षक आर.एस. जैतवार, ओ.एम. बोपचे, जे.डी. कटरे, एस.डी. पारधी, एल.सी. नागपुरे, एस.एम.सूर्यवंशी, जे.के. परतेती, बी.एस. मेश्राम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.