जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन

0
7
नवी दिल्ली, दि, ७ – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरूवारी सकाळी दिल्लीतील ‘ एम्स’ रुग्णालयात निधन झाले. श्वसनास त्रास होऊ लागल्याने सईद यांना २४ डिसेंबर रोजी उपचारांसाठी ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली आणि आज सकाळी ८ वाजता त्यांवी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्यावर्षी काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर १ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
सईद यांच्या निधनामुळे जम्मू-काश्मीरने एक राष्ट्रीय नेता गमावल्याची भावना व्यक्त होत असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.