गोंदियाच्या शीतल डोये (भोसले) हिने अमेरिकेत जिंकली सौंदर्य स्पर्धा

0
1

गोंदिया:-गोंदियाच्या शीतल डोये यांना युनायटेड स्टेट्स आयोजीत समारंभात ” मिसेस भारत एलिट कॅलिफोर्निया ” म्हणून मुकुट देण्यात आला.माय ड्रिम टीव्ही युएसए द्वारे आयोजीत प्रतिष्ठित स्पर्धेत शितलने केवळ उल्लेखनिय साैंदर्यच दाखविले नाही तर तिची प्रतिभा, बुध्दीमत्ता आणि समर्पण देखील प्रदर्शित केले.
शितलने इलेट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन मधे बी टेक केले आहे आणि तिचे लग्न अमित भोसले यांचेशी झालेले असून ती गोंदिया (महा) येथील राजेन्द्र व सिमा डोये यांची मुलगी आहे.शितल 2016 मधे युनायटेड किंगडम युके येथे स्थलांतरीत झाली व त्यानंतर ती यु एस ए येथे स्थलांतरित झाली.ती एक उत्कृष्ट चित्रकार,नृत्यांगना आणि फिटनेस तज्ञ आहे.
तिच्या विजयावर प्रतिक्रीया देतांना ती म्हणाली,” हे एक मुकुटापेक्षा अधिक आहे,माझ्या आयुष्यातील नवीन आणि आनंददायी प्रवासासाठी हा एक पायरीया दगड आहे . मी या प्लॅटफॉर्मचा वापर प्रेरणा देण्यासाठी आणि फिटनेस व फॅशन या दोन्हीचा समतोल राखणार्‍या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यास उत्सुक आहे .